मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून आला फोन?

मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी; अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी-कंपनीकडून आला फोन?

संपूर्ण मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली.
Published on

संपूर्ण मुंबई बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आली. मुंबई पोलीस नियंत्रण कक्षाला एक धमकीचा फोन आला आहे, ज्यामध्ये संपूर्ण मुंबई बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आली आहे. फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःची ओळख डी-कंपनीतील व्यक्ती म्हणून करून दिली आहे. डी कंपनीचे नेतृत्व अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम करतो.

याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धोक्यामुळे पोलीस सक्रिय झाले असून फोन करणाऱ्याने मुंबईत बॉम्बस्फोट होणार असल्याचा सांगून स्वतःला 'डी कंपनी'चा सदस्य असल्याचे सांगितले. या घटनेची माहिती बॉम्ब पथकाला देण्यात आली आणि चौकशी करण्यात आल्यानंतर काहीही संशयास्पद आढळले नसल्याची माहिती मिळत आहे.

तपासात काहीही संशयास्पद आढळले नसून धमकीचा फोन करणारा सध्या पोलिसांच्या ताब्यात आहे. पोलिसांनी फोन करणाऱ्याचे ठिकाण शोधले आणि बोरिवली येथून फोन करणाऱ्याला ताब्यात घेतले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com