पुण्यातील गुगल ऑफिसला बॉम्बने उडवण्याची धमकी, आरोपी पोलिसांच्या ताब्यात
गुगलच्या मुंबईतील कार्यालयाला सोमवारी (१३ फेब्रुवारी) धमकीचा फोन आला, ज्यामध्ये फोन करणाऱ्याने सांगितले की, पुण्यातील गुगलच्या कार्यालयात बॉम्ब ठेवण्यात आला आहे. गुगलच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना याची माहिती दिली आणि पुणे पोलिसांसह मुंबई पोलिसांनी तपास सुरू केला.
मिळालेल्या माहितीनुसार, धमकी देणाऱ्या कॉलरने आपले नाव पनयम शिवानंद असल्याचे सांगितले. आपण हैदराबादमध्ये राहतो, असेही त्याने फोनवर सांगितले. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना कार्यालयात अद्याप काहीही संशयास्पद आढळले नाही. दरम्यान, फोन करणार्याला पोलिसांनी हैदराबादमधून अटक केली आहे. मुंबई पोलिसांचे एक पथकही तेलंगणात असून फोन करणाऱ्याला मुंबईत आणण्याची तयारी करण्यात आली आहे. कॉल करण्यामागे त्या व्यक्तीचा हेतू काय होता हे अद्याप समोर आलेले नाही. पोलिसांनी फोन करणार्याविरुद्ध कलम ५०५ (१) (बी) आणि ५०६ (२) अन्वये गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे.
पोलीस अधिकारी आणि बीडीडीएस पथकाकडून संपूर्ण इमारतीची पाहणी करण्यात आली. ज्या व्यक्तीने धमकीचा फोन केला होता. त्याला आता पोलिसांनी (Police) ताब्यात घेतले असल्याची प्रथामिक माहिती समोर आली आहे .