MNSTeam Lokshahi
मनसेचे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. अटकेची टांगती तलवार असलेल्या वैभव खेडेकर यांना यामुळे दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवातील लॉटरी प्रकरणात वैभव खेडेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून गेल्या दोन दिवसांपासून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
या प्रकरणात मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांना अटक झाली असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात अली आहे. आज शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात वैभव खेडेकर यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर पार पडलेल्या सुनावणीत वैभव खेडेकर यांना जामीन मंजूर झाला आहे.