Sikandar Vs Jaat : 'सिकंदर'ला सनी देओलचा धक्का ; 'जाट'ने अवघ्या तीन दिवसांत केली इतकी कमाई
बॉलिवूड अभिनेता सलमान खानचा बहुचर्चित 'सिकंदर' चित्रपट आणि सनी देओलचा 'जाट' हा चित्रपट आता आमनेसामने आले आहेत. सनीचा 'जाट' चित्रपट सलमानच्या 'सिकंदर' ला चांगलीच टक्कर देताना दिसत आहे. 30 मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या 'सिकंदर'ने 13 व्या दिवशी केवळ 30 लाख कमाई केली आहे. 10 एप्रिल रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने 11 एप्रिल रोजी 7 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे कोणत्या चित्रपटाने अधिक कमाई केली आहे? याबद्दलची माहिती समोर आली आहे.
'जाट' चित्रपटाने तीन दिवसांत मिळून 26 कोटीचा आकडा गाठला, तर 'सिकंदर'ने पहिल्याच दिवशी ही कमाई केली होती. मीडिया रिपोर्टनुसार, त्यामुळे या चित्रपटाने तीन दिवसात एकूण 26.50 कोटी रुपयांचे कलेक्शन केले आहे. तर रीलिजनंतर दुसऱ्या शनिवारी सिकंदरचे कलेक्शन जवळपास ४० लाख रुपये आहे. आतापर्यंत 'सिकंदर'ने 108.47 कोटींची कमाई केली आहे.
दरम्यान आता अक्षय कुमारचा 'केसरी 2' हा चित्रपट 18 एप्रिल रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. जालियनवाला बाग हत्याकांड या विषयावर हा चित्रपट आहे. या चित्रपटामध्ये अभिनेत्री अनन्या पांडेदेखील दिसून येणार आहे. त्यामुळे सनी देओलच्या 'जाट'वर अक्षय कुमारचा 'केसरी 2' भारी पडणार का? असा प्रश्न आता चाहत्यांना पडला आहे.