ताज्या बातम्या
विदर्भात तापमानाचा कहर: ब्रह्मपुरी 42 अंशांवर, जगातील आठव्या क्रमांकाचे उष्ण शहर
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात उन्हाचा तडाखा तीव्र झाला आहे. यातच जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत भारतातील पाच शहरे होती. यामध्ये चार विदर्भातील असून प्रयागराज हे पाचवे आहे.
विदर्भात तापमान वाढले असून ब्रह्मपुरी हे गुरुवारी जगातील आठव्या क्रमांकावर आले आहे. पुढील सात दिवस हवामान कोरडे राहणार असून ब्रह्मपुरी येथील 42 अंशांच्या आसपास तापमान राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत भारतातील 5 शहरे असल्याची माहिती मिळत असून नागपूर अकराव्या तर अकोला व चंद्रपूर चौदाव्या व पंधराव्या क्रमांकाचे शहर ठरले आहे.