Lokshahi Marathi Sanwad 2025 : राजकीय नेते, धोरणकर्ते, उद्योजक आणि विचारवंत यांच्या उपस्थितीत विचारमंथन आणि चर्चा; 'पश्चिम महाराष्ट्र संवाद' पाहा फक्त लोकशाही मराठीवर
"LOKशाही मराठीसोबत पुढे जाऊया, प्रगती करूया, आपला पश्चिम महाराष्ट्र पुढे नेऊया" लोकशाहीच्या या व्यासपीठवर आज 11 ऑक्टोबर पश्चिम महाराष्ट्रच्या विकासाचा संवाद रंगणार आहे. या कार्यक्रमात गुणवंतांचा गौरव केला जाणार आहे. लोकशाही मराठी' या मराठी न्यूज चॅनलतर्फे "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" या कार्यक्रमाचे आयोजन द ऑर्किड हॉटेल पुणे येथे करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाला सकाळी 9 वाजल्यापासून सुरवात होणार असून या कार्यक्रमात महाराष्ट्रातील नामवंत पाहुणे उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्राचं राजकारण, सत्ताकारण, समाजकारण, पर्यटन, आरोग्य आदींसह सांस्कृतिक क्षेत्राबद्दल चर्चा केली जाणार आहे. या सह पश्चिम महाराष्ट्रच्या भूमीतून आलेल्या दिग्गज मान्यवरांचा सत्कार या कार्यक्रमात केला जाणार आहे.
पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांची ध्येयधोरणे काय असतील यावर सविस्तर माहिती या कार्यक्रमात मांडली जाणार असून. पश्चिम महाराष्ट्राच्या भविष्यासाठी राजकीय नेत्यांचं उद्योजकांच व्हिजन काय आहे? तसेच पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप पुढे कसा असणार आहे, हे या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतलं जाणार आहे.
या कार्यक्रमाला
सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ
अभिनेत्री तेजस्वीनी पंडीत
शिवसेना एकनाथ शिंदे पक्षातील रविंद्र धंगेकर / राष्ट्रवादी कॉंग्रस अजित पवार पक्ष रुपाली ठोंबरे पाटील
कृषी मंत्री दत्तात्रय भरणे
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर
सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
राष्ट्रवादी कॉंग्रस शरद पवार पक्ष हर्षवर्धन पाटील
आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
या दैदीप्यमान सोहळ्यात पश्चिम महाराष्ट्राच्या वेगवान विकासाचं व्हिजन आणि पश्चिम महाराष्ट्राच्या प्रगतीचा संवाद ऐकण्यासाठी रविवार दिनांक आज 11 ऑक्टोबरला सकाळी 9 वाजल्यापासून पाहा "पश्चिम महाराष्ट्र संवाद 2025" फक्त लोकशाही मराठी न्यूजवर...