तुमचा नाश्ता महागला; ब्रेडच्या किमती कडाडल्या

तुमचा नाश्ता महागला; ब्रेडच्या किमती कडाडल्या

महागाई वाढतच चालली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महागाई वाढतच चालली आहे. महागाईचा आलेख वाढताच आहे. या महागाईमुळे सामान्यांच्या खिशाला चांगलीच कात्री बसली आहे. व्हाईट ब्रेडच्या किमतीत वाढ झाली आहे. व्हाईट ब्रेडच्या किमतीत 3 ते 8 रुपयांची वाढ झाली आहे.

मैद्याच्या किमतीत वाढ झाल्याने ब्रेडच्या किमतीत वाढ झाली आहे. ब्रेड 35 रुपयांवरुन आता 38 रुपयांवर गेला आहे. ब्राऊन ब्रेडच्या किमतीत वाढ झाली नाही आहे त्या किमती स्थिर आहेत. 350 ते 400 ग्रॅमचा ब्रेड 35 रूपयांवरून 38 रूपये तर 200 ग्रॅमचा मिनी ब्रेड 18 रूपयांवरून 20 रुपये एवढा झाला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com