Washim
Washim Team Lokshahi

वाशिममध्ये नवरी प्रियकरासह मंडपातून भुर,नवरदेव रिकाम्या हाताने परतला..!

अखेर हताश होत नवरदेव आपल्या पाहुण्यासह आल्या पावली परत गेला.
Published by :
Sagar Pradhan
Published on

गोपाल व्यास | वाशिम: वाशिम जिल्ह्यात सध्या लग्नाची धामधूम सुरू आहे. रिसोड शहरात देखील एका संस्थानवर लग्नासाठी वर्हाडी जमले, नवरदेव वाजत गाजत मित्र परिवारासह लग्न मंडपी जाण्यासाठी निघाला. नवरीही सजून तयार होती. मात्र, झाले उलटेच वधूने वराला चकमा देत थेट लग्न मंडपातून आपल्या प्रियकरा सह पलायन केल्याने नवरदेवाची चांगलीच फिजिती झाली.

रिसोड येथील एका संस्थानवर लग्न सोहळा सुरू होता. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील नवरदेव वऱ्हाडी मंडळीसह रिसोड शहरातील लग्न स्थळी पोहचले. पाहुणे जमले. नवरदेव मित्र मंडळीसह मोठ्या उत्साहात डीजेच्या तालावर नाचत होते. लग्न घटिका जवळ आली. नवरी नटली मात्र, नवरीच्या मनात काही उलटेच चक्र चालत होते. तिने टॉयलेट ला जाण्याचा बहाणा करून आपल्या प्रियकरासह लग्न मंडपातून पलायन केले.

बराच वेळ नवरी आढळून न आल्याने पाहुणे मंडळीनी तिची शोधाशोध घेतली. परंतु ती तिच्या प्रिकराला घेऊन पसार झाल्याचे लक्ष्यात आले. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. अखेर हताश होत नवरदेव आपल्या पाहुण्यासह आल्या पावली परत गेला. या घटनेची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली असून जग बदलत चालले असून प्रेमाचे संदर्भ देखील बदलत चालले असून युध्दात आणि प्रेमात काय होईल हे सांगणे कठीणच आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com