Buddha Purnima 2025 Wishes : आपल्या प्रियजनांसाठी शुभेच्छा, व्हाट्सॲप संदेश, कोट्स, फेसबुक स्टेटस
वैशाख पौर्णिमेला गौतम बुद्ध यांचा जन्म झाला होता. यासाठी ही तिथी बुद्ध पौर्णिमा नावाने ओळखली जाते. यंदाच्या वर्षी 11 मे रोजी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाणार आहे. ही तिथी वर्षातील सगळ्यात पवित्र आणि महत्त्वाची मानली जाते. बुद्ध पौर्णिमा आणखी तीन कारणांसाठी विशेष आहे. ती म्हणजे, याच दिवशी गौतम बुद्धांचा जन्म झाला होता. याच दिवशी बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली होती आणि याच दिवशी बुद्धांचे महानिर्वाण झाले होते, असे सांगितले जाते. बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नव्हे तर जगातील अनेक देशांत साजरी केली जाते. जाणून घेऊया बुद्ध पौर्णिमेचे महत्त्व आणि आर्य सत्य...
भगवान बुद्धांच्या शांती व करुणेच्या मार्गावर
आपण सर्वांनी वाटचाल करूया...
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा
अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे,
दया, क्षमा, शांतीची शिकवण देणारे,
विश्व वंदनीय गौतम बुद्ध,
यांच्या जयंती निमित्त हार्दिक शुभेच्छा
क्रोधाला प्रेमाने,
पापाला सदाचारने,
लोभाला दानाने आणि
असत्याला सत्याने जिंकता येते..
बुद्ध पौर्णिमा निमित्त,
आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
बुद्धं शरणं गच्छामि !
धम्मं शरणं गच्छामि !
संघं शरणं गच्छामि !
बुद्ध पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
जगाला एक चांगले स्थान बनवण्यासाठी आपण भगवान बुद्धांच्या शिकवणीनुसार जगूया. बुद्ध जयंतीच्या शुभेच्छा.