आज संसदेत अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय होणार महाग?

आज संसदेत अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय होणार महाग?

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्म मधला शेवटचा पूर्ण अर्थ संकल्प सादर करणार आहेत. सकाळी 10.15 वाजता कॅबिनेट बैठकीत बजेटला मंजुरी देतील. सकाळी 11 वाजता लोकसभेत बजेट मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात कोणत्या मोठ्या घोषणा होणार, करदात्यांना दिलासा मिळणार का, रेल्वे अर्थसंकल्पीय तरतुदीत कोणत्या घोषणा होणार, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील हा पाचवा आणि शेवटचा अर्थसंकल्प असणार आहे. अधिवेशनादरम्यान 14 फेब्रुवारी 2023 ते 12 मार्चपर्यंत सुट्टी असेल. अधिवेशनाचा दुसरा टप्पा 13 मार्चपासून सुरू होणार आहे. देशात काय स्वस्त होणार आणि काय महाग होणार? सर्वसामान्यांच्या करात वाढ होणार की त्यांना दिलासा मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणार आहेत.

काय होणार महाग?

ज्या वस्तूंवर आयात शुल्क वाढवलं ​जाऊ शकते त्यात खाजगी जेट, हेलिकॉप्टर, हाय-एंड इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, प्लास्टिकच्या वस्तू, दागिने, हाय ग्लॉस पेपर, स्टील उत्पादने, चामडे आणि जीवनसत्त्वे यांचा समावेश आहे. करात वाढ आणि आयातीतील घट यामुळे या वस्तूंच्या उत्पादनाला देशात प्रोत्साहन मिळू शकते. तसेच 35 हून अधिक वस्तूंवरील आयात शुल्क वाढवलं ​​जाऊ शकते. विविध मंत्रालयांच्या शिफारशींनंतर सरकारने यादी तयार केली आहे. या यादीमध्ये 35 वस्तूंचा समावेश आहे. क्रीडा साहित्य, लाकडी फर्निचर आणि पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचा समावेश आहे. हे दोन्ही देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उत्पादनांसाठी समान आहेत.अशी माहिती मिळाली आहे.

काय होणार स्वस्त?

यासोबतच या वस्तू स्वस्त होऊ शकतात त्या म्हणजे देशातून दागिने आणि इतर तयार उत्पादनांची निर्यात वाढण्यास मदत होईल. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 10.75 टक्क्यांवरून 15 टक्के केले होते. तर सरकारने विमान वाहतूक, इलेक्ट्रॉनिक्स, स्टील आणि औद्योगिक उत्पादन क्षेत्रातील कस्टम ड्युटी रद्द केली होती.

आज संसदेत अर्थसंकल्प होणार सादर; काय होणार स्वस्त, काय होणार महाग?
आज संसदेत अर्थसंकल्प होणार सादर; केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण अर्थसंकल्प मांडणार
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com