आधी केसगळती, आता नखं होतायत गायब; बुलढाण्यात नेमकं घडतंय तरी काय?

आधी केसगळती, आता नखं होतायत गायब; बुलढाण्यात नेमकं घडतंय तरी काय?

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव अशा अनेक गावात अचानक केस गळती सुरु झाली.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव अशा अनेक गावात अचानक केस गळती सुरु झाली. यामुळे नागरिक हैराण झाले होते. नागरिकांमध्ये या भीतीचे वातावरण कायम आहे. या टक्कल व्हायरसने चिंता वाढवली असतानाच आता पुन्हा एकदा बुलढाण्यात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलं असतानाच आता नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली असून अनेकांची नखे गळून पडली असल्याची माहिती मिळत आहे.

त्यामुळे या परिसरात आता भीतीचं वातावरण पसरलं आहे. नक्की हा कुठला आजार आहे? याची अजून माहिती मिळाली नाही आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com