बुलढाण्यातील नेत्याला कॉंग्रेस प्रदेशाध्यपदाची लॉटरी! कोणाचं नाव चर्चेत?

बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांना मागे टाकत हर्षवर्धन सपकाळ बाजी मारणार का?

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाला. त्याचप्रमाणे दिल्ली विधानसभा निवडणुकीतही कॉँग्रेसला मोठा पराभव सहन करावा लागला. मात्र आता कॉंग्रेस पक्षामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. नाना पटोले यांचे पद जाण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आता प्रदेशाध्यक्ष पदी कोणाची वर्णी लागणार? याकडे आता सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीबाबत कोल्हापूरचे नेते सतेज पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी मंत्री अमित देशमुख, आमदार विश्वजीत कदम आशा अनेक नेत्यांची नावं समोर आली होती. मात्र आता बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com