Buldhana Accident
Buldhana Accident

Buldhana Accident : बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटी-ट्रकचा भीषण अपघात, 5 जणांचा मृत्यू

मुंबई - नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात.....

बुलढाणा : मुंबई - नागपूर जुन्या महामार्गावर एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. बुलढाण्यातील सिंदखेडराजा जवळ एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 जण जखमी झाले आहेत. भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेनं हा भयंकर अपघात घडला आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालयाच उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव ट्रक आणि एसटीच्या धडकेने हा भयंकर अपघात घडला आहे. या अपघातातील मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जखमींवर सिंदखेडराजा रुग्णालया येथे उपचार सुरु आहेत. तर अपघातास्थळी पोलीस आणि स्थानिकांकडून बचावकार्य सुरु असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. या अपघातात बस चालकाचा जागीच मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com