वर्ध्यात बैलगाडा शर्यतीत 'डोबरीया चपरी' बैलजोडीने पटकावलं पहिलं क्रमांक

वर्ध्यात बैलगाडा शर्यतीत 'डोबरीया चपरी' बैलजोडीने पटकावलं पहिलं क्रमांक

खासदार महोत्सवात ;तीन दिवसीय शंकटपट व कृषी प्रदर्शनी शेतकऱ्यांना आकर्षक
Published by :
Sagar Pradhan

भूपेश बारंगे|वर्धा: जिल्ह्यातील कारंजा शहरात तीन दिवसीय खासदार महोत्सवात शंकरपट व कृषी प्रदर्शन आयोजन करण्यात आले होते.शेतकऱ्यांच्या आकर्षनासाठी बैलगाडा शर्यतीचा शंकरपट शिरीष भांगे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार रामदास तडस, सुमित वानखेडे यांनी केलं.

संत लटारे महाराज मंडळकडून शहरात अनेक वर्षानंतर शंकटपट व कृषी प्रदर्शनी भरविण्यात आला.यावेळी तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित राहून आनंद साजरा केला.कृषी प्रदर्शनी मध्ये शेतकऱ्यांना शेती व्यवसाय अवजारे, स्प्रिंकलर अनेक नवीन तंत्रज्ञांची माहिती देऊन मार्गदर्शन केले.

शंकरपटात तालुका व वेगवेळ्या जिल्ह्यासह राज्याबाहेरील बैलजोडी शर्यतीत धावल्या.यावेळी 113 बैलजोडी बैलगाडा शर्यतीत भाग घेतला होता.या शर्यतीत मध्यप्रदेश मधील बैतुल जिल्ह्यातील बेरीया येथील शेतकरी आरीज पटेल या शेतकऱ्यांची डोबरीया व चपरी नावाच्या बैलजोडी प्रथम क्रमांक पटकविला,तर दुसरा क्रमांक समीर पाटील यांच्या बजरंगी व बादशहा या बैलजोडीचा आला. तिसरा क्रमांक रामप्रसाद राठोड बैतुल येथील चिमणा सुलतान या बैलजोडीचा आला आहे.तालुका गटमध्ये गोपालराव जाधव कैन्हया साई या बैलजोडी प्रथम क्रमांक पटकावला, दुसरा क्रमांक उमाकांत तायवाडे यांच्या बैलजोडी पटकावला. तीन दिवस असलेला शंकरपटाचे काल समारोप करण्यात आला.

बैलगाडा शर्यतीत जिंकलेल्या बैलजोडी मालकाला पारितोषिक देण्यात आले.यावेळी प्रथम क्रमांकच्या जोडीला 51 हजारांचे बक्षीस देण्यात आले.यावेळी आमदार दादाराव केचे, जगदीश डोळे ,शिरीष भांगे यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.पंधरा वर्षानंतर पहिल्यांदाच कारंजा शहरात शंकरपट आयोजित केल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी बघण्यासाठी गर्दी केली होती. संत लटारे महाराज शंकरपट व खासदार महोत्सव यांच्या सयूंक्त हा शंकरपट घेण्यात आला .यावेळी आमदार दादाराव केचे, शिरीष भांगे, जगदीश डोळे, संजय कदम, सुधाकर दुर्गे, राजू डोंगरे, दिलीप जसुतकर, सुनील वंजारी, वैशाली सरोदे, योगिता कदम, उषा चव्हाण, पिंटू वाटकर, नितीन बनकर यांची उपस्थिती होती.या शंकरपटाला गावकऱ्यांनी सहकार्य केले.

बादशहा व टिकल्याची दोरी 'लक्ष्मी'च्या हाती

शंकटपटमध्ये नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील येवती या गावाच्या 19 वर्षीय लक्ष्मीने बादशहा व टिकल्या नावाच्या बैलगाडा हाकलली. मुलीने हाकलले बैलजोडी सर्वांसाठी आकर्षण ठरली होती. लक्ष्मी सोनबवणे अस त्या मुलीचे नाव आहे.या मुलीचे आमदार दादाराव केचे व आयोजकाकडून स्वागत करण्यात आले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com