फलटणमध्ये भाजपा आ.जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे दहन
Admin

फलटणमध्ये भाजपा आ.जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे दहन

म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याचे पडसाद फलटण शहरमध्ये उमटले.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

प्रशांत जगताप, सातारा

म्हसवडमध्ये आमदार जयकुमार गोरे यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याचे पडसाद फलटण शहरमध्ये उमटले. फलटण शहर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करून आपला राग व्यक्त केला आहे.

फलटणमध्ये भाजपा आ.जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे दहन
स्वच्छ सर्वेक्षणात सातारा नगरपालिकेचा राज्यात तिसरा तर देशात 11वा नंबर

रामराजेंच्या समोर आमदार जायकुमार गोरे यांची पात्रता नाही. त्यांनी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी विनाकारण रामराजे यांच्याविरोधात चुकीचे वर्तन केल्यास जश्यास तसे उत्तर दिले जाईल असे सांगत म्हसवड येथील पुतळा दहनच्या घटनेला जशास तसे उत्तर देत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी आमदार गोरेंच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीये.

फलटणमध्ये भाजपा आ.जयकुमार गोरे यांच्या पुतळ्याचे दहन
रामराजे म्हणजे मांडूळाची औलाद; आमदार जयकुमार गोरे यांची घनाघाती टीका
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com