बारामतीत सांगवी रस्त्यावर सहलीच्या बसचा अपघात; 24 जण जखमी तर तीन मुली गंभीर
Admin

बारामतीत सांगवी रस्त्यावर सहलीच्या बसचा अपघात; 24 जण जखमी तर तीन मुली गंभीर

इचलकरंजी येथून शिर्डी व औरंगाबाद येथे गेलेल्या विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला माघारी परतताना बारामतीतील पाहुणेवाडी येथे पहाटे तीन वाजता अपघात झाला.
Published on

विकास कोकरे, बारामती

इचलकरंजी येथून शिर्डी व औरंगाबाद येथे गेलेल्या विद्यार्थिनींच्या सहलीच्या बसला माघारी परतताना बारामतीतील पाहुणेवाडी येथे पहाटे तीन वाजता अपघात झाला. यात तीन मुली गंभीर तर २४ मुली किरकोळ जखमी झाल्या आहेत. इचलकरंजी येथील सागर क्लासेस या खाजगी क्लासेसच्या वतीने इचलकरंजी ते शिर्डी, औरंगाबाद अशी सहल विद्यार्थ्यांची आयोजित करण्यात आली होती.

४८ विद्यार्थिनी व ४ शिक्षकांना घेऊन ही बस बारामतीमार्गे शिर्डीहून इचलकरंजीला निघाली होती. पाहुणेवाडी येथे बस चालकाला अंदाज न आल्याने व चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने पुलावरून बस थेट खाली गेली. जखमींना उपचारासाठी बारामतीत शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com