३० प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागच्या ३ चाकांवर धावली लालपरी

३० प्रवाशांचा जीव धोक्यात घालून मागच्या ३ चाकांवर धावली लालपरी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही ही बस धावली.
Published by :
Siddhi Naringrekar

विकास काजळे, इगतपुरी

अहमदनगर जिल्ह्यातील अकोले आगारातून कसारा येथे प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या एसटी बसच्या मागील भागात चार पैकी एक चाक नसूनही ही बस धावली. विशेष म्हणजे 30 पेक्षा जास्त प्रवाशांना घेऊन लोकांचा जीव धोक्यात घालण्याची लीला ह्या बसने केली आहे.

इगतपुरी जवळ महामार्गावरून ही बस धावत असतांना अन्य एका वाहनधारकाने बसचालकाला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली. यानंतर ही बस महिंद्रा कंपनीजवळ थांबवण्यात आली आहे. एसटी बसचा क्रमांक MH 15 BT 4129 असून अनेक प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उपस्थित प्रवाशाने केली आहे.

अकोलेहुन कसारा पर्यंत अनेक वळणदार रस्ते, घाट असल्याने अशा बेजबाबदार कारभारामुळे कोणतीही मोठी दुर्घटना घडू शकली असती. सुदैवाने ही घटना उघडकीस आल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com