Cabinet Expansion: राज्यात मंत्रिमंडळ स्थापन, ३९ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधलेला मंत्रिमंडळ विस्तार सोहळा आज संपन्न झाला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात नव्या महायुती सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला आहे. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आमदारांना मंत्रिपदाची शपथ दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पद आणि गोपनियतेची शपथ देण्यात आली. नागपुरामध्ये ३३ वर्षांनी शपथविधी सोहळा पार पडला.
नागपुरात नव्या मंत्रिमंडळात ३९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये भाजपच्या १९, शिवसेनेच्या ११ आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. ३३ आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची तर ६ आमदारांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. भाजपच्या ३ आमदारांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. शिवसेनेच्या २ मंत्र्यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तर राष्ट्रवादीच्या एका आमदाराने राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
राज्यमंत्रिपदी कुणाची लागली वर्णी?
भाजपकडून माधुरी मिसाळ, पंकज भोयर, मेघना बोर्डीकर तर शिवसेनेकडून आशिष जैस्वाल, योगेश कदम, आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून इंद्रनील नाईक यांची वर्णी लागली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील नवे मंत्री
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे.
भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते गिरीश महाजन यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते गणेश नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते दादा भुसे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते जयकुमार रावल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते अतुल सावे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते अशोक उइके यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दत्तात्रेय भरणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या अदिती तटकरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते शिवेंद्र राजे भोसले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते माणिकराव कोकाटे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते जयकुमार गोरे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते संजय सावकारे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते भरत गोगावले यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मकरंद जाधव पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते नितेश राणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते आकाश पांडुरंग फुंडकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते प्रकाश आबिटकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते आशिष जैस्वाल यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेते पंकज भोयर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
शिवसेनेचे नेते योगेश कदम यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते इंद्रनिल नाईक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेत्या मेघना बोर्डीकर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
भाजप नेत्या माधुरी मिसाळ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबासाहेब पाटील यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सविस्तर बातमी पाहण्यासाठी क्लिक करा-