Admin
बातम्या
2024 च्या विधानसभा निवडणुकीत परळीसह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभे करणार - छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा
2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळी सह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केलीय.
विकास माने, बीड
2024 च्या विधानसभा निवडणुकीत स्वराज्य पक्ष परळी सह संपूर्ण महाराष्ट्रात उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा छत्रपती संभाजीराजेंनी केलीय. बीडच्या परळी शहरात आयोजित एका कार्यक्रमा दरम्यान माध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिलीय.
2024 मध्ये स्वराज्य पक्ष हा कुठल्याही परिस्थितीत राजकारणात येणार असून प्रत्येक ठिकाणी उमेदवार उभा करणार आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी स्वराज्य पक्ष कटीबद्ध असल्याचं संभाजीराजे यांनी म्हटलं. तसेच मला देखील परळीतील दहशतीबद्दल ऐकून धक्का बसला असं म्हणत संभाजीराजेंनी अप्रत्यक्षरीत्या धनंजय मुंडेंना लक्ष केले. मुंडेंच्या परळी मध्ये माधवराव जाधव यांच्या मित्र मंडळ कार्यालयाच्या उद्घाटनासाठी संभाजी राजे आले होते. यादरम्यान त्यांनी सरकारवर देखील सडकून टीका केली.