ताज्या बातम्या
पुणे शहरातील खराडी येथे आढळली गांजाची झाडे
पुणे शहरातील खराडी येथील पीएमसीच्या ग्राउंड मध्ये गांजाची झाडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे.
पुणे |चंद्रशेखर भांगे | पुणे शहरातील खराडी येथील पीएमसीच्या ग्राउंडमध्ये गांजाची झाडे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत पुण्यात मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ आढळत येत असतानाच खराडीमध्ये तर पीएमसीच्या ग्राउंडमध्येच चक्क गांजाची झाडे आढळून आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
महात्मा गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम राबवताना सामाजिक कार्यकर्त्यांना गांजाची झाडे आढळून आली. येथे गांजाची झाडे आढळून आल्याने माजी आमदार बापूसाहेब पठारे व सामाजिक कार्यकर्त्या प्रभा करपे व नागरिकांनी नाराजी व्यक्त करत महानगरपालिकेने या खेळाच्या ग्राउंडकडे लक्ष देण्याची मागणी केली आहे. आता या घटनेकडे पुणे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासन कशाप्रकारे पाहते हे पाहणे महत्त्वाचे आहे.