Aurangabad
Aurangabad Team Lokshahi

उपोषणात औरंगाजेबाचे पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात अखेर गुन्हा दाखल; अज्ञातांचा पोलिसांकडून शोध सुरू

पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

सचिन बडे|छत्रपती संभाजीनगर: अनेक वर्षांपासून प्रलंबित असेलल्या औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अखेर काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने मंजुरी दिले. त्यामुळे औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचे नाव धाराशिव झाले. मात्र, एकीकडे नामांतराला मंजुरी मिळाल्यानंतर जल्लोष साजरी होत असताना दुसरीकडे आता या निर्णयाचा विरोध होताना देखील दिसत आहे. याच नामांतराविरुद्ध औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीचे कालपासून साखळी उपोषण सुरु झाले. मात्र, त्यावेळी या आंदोलनात औरंगजेबाचे फोटो झळकवण्यात आल्याचे दिसून आले, त्यामुळे सदर ठिकाणी मोठा वाद निर्माण झाला. त्याच प्रकरणी आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Aurangabad
....मूग गिळून गप्प बसणार? छत्रपती संभाजीनगरमधील 'त्या' प्रकरणावरून बावनकुळेंची ठाकरेंवर टीका

औरंगाबाद जिल्ह्याचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्यात आले. या विरोधात औरंगाबाद नामांतर विरोधी कृती समितीच्या वतीने कालपासून साखळी उपोषण करण्यात येत आहे. परंतु, तर याच उपोषणादरम्यान एक मोठी घटना घडली. उपोषणात काही अज्ञात लोकांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकवले. त्यानंतर तो व्हिडिओ प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेवर राजकीय मंडळींकडून देखील तीव्र प्रतिक्रिया येऊ लागल्या. याच प्रकरणी आज छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. आंदोलनात 'औरंगजेबा'चे पोस्टर झळकवणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील सिटी चौक पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी चार अज्ञात व्यक्तींच्या विरोधात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. आता या चारही अज्ञात व्यक्तींचा पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com