Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

Ravindra Dhangekar: आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल! नेमकं कारण काय?

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि कसबा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. धंगेकर यांच्यासह 30 ते 40 सहकार नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाला आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी भाजपने पैसे वाटल्याच्या आरोपाखाली पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले होते.

सहकारनगर पोलीस ठाण्यात भाजप विरोधात जमावबंदीचा उल्लघन केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निवडणुकीच्या काळात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी पोलिसांनी पुणे शहरात कलम 144 लागू केले होते. जमाव जमविण्यास बंदी घातलेली असताना देखील आमदार धंगेकर यांनी बेकायदा जमाव जमविला. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आचारसंहीतेचा भंग करून बेकायदेशीर जमाव जमवून आणि घोषणा देवून वरील आदेशाचे उल्लंघन करताना मिळुन आल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दखल करण्यात आला आहे.

आता या आंदोलनामुळे धंगेकर अडचणीत सापडले आहेत. या आंदोलनामुळे त्यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143, 145, 149, 188 आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135, लोकप्रतिनिधी अधिनियम 1951चे कलम 126 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com