Shantigiri Maharaj
Shantigiri Maharaj

मोठी बातमी! EVM मशिनला हार घातल्याप्रकरणी शांतीगिरी महाराजांवर गुन्हा दाखल

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published by :

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार शांतीगिरी महाराजांनी आचारसंहिता नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतीगिरी महाराजांनी सकाळी ७ वाजता मतदान केल्यानंतर आपल्या गळ्यातील हार ईव्हीएम मशिनला घातला. त्यामुळे विरोधकांनी त्यांना धारेवर धरलं होतं. याच पार्श्वभूमीवर आता शांतीगिरी महाराजांवर गुन्ह्याची नोंद करण्यात आलीय.

शांतीगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात मदतान केलं. सकाळी सात वाजता मतदान केल्यावर महाराजांनी ईव्हीएम कंपार्टमेंटला हार घातला. आम्ही सर्व गोष्टींमध्ये देव बघतो, इव्हीएम मशिनमध्येही देव आहे, असं महाराज म्हणाले होते. महाराजांनी मतदान केंद्रावर गैरवर्तणूक केल्याची तक्रार नायब तहसीलदारांनी केली होती, अशी माहिती समोर आलीय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com