‘सिल्व्हर ओक’वर हल्ला प्रकरण; ११८ निलंबित ST कर्मचाऱ्यांना CM शिंदेंनी पुन्हा सेवेत घेतलं, शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (sharad pawar) यांच्या निवासस्थानी अचानकपणे शेकडो एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी या आंदोलक कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या ( Silver Oak St Protest )दिशेनं चपला भिरकावल्या तर महिला आंदोलकांनी बांगड्या फोडत पवार कुटुंबियांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली होती.
याच प्रकरणात आता हा हल्ला केल्याचा आरोप असलेल्या ११८ एसटी कामगारांना पुन्हा सेवेत घेण्याचा निर्णय राज्यामध्ये तीन महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने घेतला आहे. हा निर्णय मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, परिवहन अपर मुख्य सचिव आशिषकुमार सिंह,वित्त अपर मुख्य सचिव मनोज सौनिक,महसूल अपर मुख्य सचिव नितीन करीर,परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या उपस्थित हा निर्णय घेण्यात आला.
एसटी महामंडळाच्या विविध प्रश्नांसंदर्भात शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीची माहिती महाराष्ट्र सरकारच्या माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या अधिकृत ट्वीटर हॅण्डलवरुनच देण्यात आली. या निर्णयावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले की, “सरकारचा निर्णय आहे सरकारने ठरवावं असे त्यांनी सांगितले आहे.