Bhaskar Jadhav Son
ताज्या बातम्या
Bhaskar Jadhav Son : भास्कर जाधव यांच्या मुलाविरोधात गुन्हा दाखल; काम मागणाऱ्या स्थानिक ठेकेदाराला मारहाण
काम मागणाऱ्या स्थानिक ठेकेदाराला मारहाण
थोडक्यात
भास्कर जाधवांच्या मुलाची गुंडगिरी?
काम मागणाऱ्या स्थानिक ठेकेदाराला मारहाण
विक्रांत जाधव यांच्यासह 2 जणांवर गुन्हा दाखल
(Bhaskar Jadhav Son) भास्कर जाधवांच्या मुलाने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यातील औद्योगिक वसाहतीमध्ये असणाऱ्या विजय केमिकल कंपनीच्या परिसरात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी चर्चा करण्यास गेलेल्या शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुख सचिन काते यांना मारहाण केल्या प्रकरणी विक्रांत भास्कर जाधव व अन्य दोन जणांसह काही अनोळखी व्यक्तींवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विक्रांत जाधव याच्याकडून काम मागणाऱ्या स्थानिक ठेकेदाराला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असून खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
