ताज्या बातम्या
Justice Yashwant Verma: न्यायाधीशांच्या घराला लागली आग, सापडले पैशांचे घबाड
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागल्याची माहिती मिळत आहे.
न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या शासकीय निवासस्थानी होळीच्या दिवशी आग लागल्याची माहिती मिळत आहे. त्या दिवशी ते घरात नसल्याने त्यांनी अग्निशामक दल आणि पोलिसांना फोनवरून आग लागल्याची माहिती दिली. आग विझल्यानंतर बंगल्यातील काही खोल्यांमध्ये अग्निशामक दलाला मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची बदली करण्यात आली असून त्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयात त्यांच्या मूळ पोस्टिंगवर पाठविण्यात आले आहे.