आजपासून CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात

आजपासून CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेला सुरुवात

आजपासून सीबीएसईची (CBSE) दहावी आणि बारावीची परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

आजपासून सीबीएसईची (CBSE) दहावी आणि बारावीची परीक्षा आज 15 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. परीक्षेआधी विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. CBSE बोर्डाची परीक्षा सकाळी 10.30 ते दुपारी 1.30 या वेळेत घेण्यात येईल.

दहावीच्या परीक्षा 15 फेब्रुवारी ते 21 मार्च या कालावधी दरम्यान होणार आहेत. तर बारावीच्या परीक्षा या 15 फेब्रुवारी ते 5 एप्रिलदरम्यान होतील. यंदा 38 लाखांहून अधिक विद्यार्थी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेला बसणार आहेत. सीबीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेला एकूण 21.8 लाख विद्यार्थी आणि 16.9 लाख विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसणार आहेत.

CBSE बोर्डाच्या मार्गदर्शक सूचना

परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांनी शालेय गणवेश परिधान करावा आणि शाळेचे ओळखपत्र सोबत ठेवावं. तसेच विद्यार्थ्याकडे सीबीएसईचं प्रवेशपत्र असावं.

सकाळी 10 वाजल्यानंतर कोणत्याही विद्यार्थ्याला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळणार नाही,

कोणतीही इलेक्ट्रॉनिक उपकरणं किंवा मोबाईल फोन, जीपीएस, कॅल्क्युलेटर, गॅझेट्स, इलेक्ट्रॉनिक घड्याळे इत्यादी सोबत ठेवू नका.

परीक्षेदरम्यान कोणत्याही प्रकारचा गैरमार्ग निवडू नका आणि सर्व नियमांचं योग्यरित्या पालन करा.

परीक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारच्या अफवा पसरवू नका

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com