Gold Rate : देशभरातील सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; खरेदीदार सावध भूमिकेत
Gold Rate : देशभरातील सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; खरेदीदार सावध भूमिकेतGold Rate : देशभरातील सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; खरेदीदार सावध भूमिकेत

Gold Rate : देशभरातील सोन्या-चांदीच्या किंमती स्थिर; खरेदीदार सावध भूमिकेत

सोन्याचे दर स्थिर: सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किंमतीत किरकोळ वाढ, खरेदीदार सावध.
Published by :
Team Lokshahi
Published on

Gold and Sliver Rate : सणासुदीच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या भावामध्ये गेल्या काही दिवसांत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली होती. काही दिवसांतच 10 तोळ्यामागे तब्बल ₹3,000 ते ₹8,000 इतका भाव वाढल्याने ग्राहक चिंतेत आले होते. मात्र आजच्या व्यवहारात सोन्याचे दर स्थिरावले असून केवळ किरकोळ वाढ झाली आहे.

आज 24 कॅरेट सोन्याचा दर ₹1,02,610 प्रति तोळा झाला आहे. कालच्या तुलनेत केवळ ₹10 वाढ झाली आहे, तर 10 तोळ्यांचा दर ₹10,26,100 वर पोहोचला आहे. 22 कॅरेट सोन्याचा दर ₹94,060 प्रति तोळा असून 8 ग्रॅमसाठी ₹75,248 मोजावे लागणार आहेत. यामध्येही फक्त ₹10 चीच वाढ झाली आहे.

18 कॅरेट सोन्याच्या दरातदेखील तितकीच वाढ झाली असून आज प्रति तोळा भाव ₹76,960 झाला आहे. 10 तोळ्यांचा दर ₹7,69,000 तर 8 ग्रॅमसाठी ₹61,568 आकारले जात आहेत. अशा प्रकारे सर्व कॅरेटमध्ये दरात एकसारखी किरकोळ वाढ दिसून आली आहे.

गेल्या काही दिवसांतील झपाट्याने झालेल्या वाढीच्या तुलनेत आजची वाढ अत्यल्प असल्याने खरेदीदारांना थोडासा दिलासा मिळाला आहे. सणासुदीच्या काळात दरांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात असून, ग्राहक सोन्याच्या भावाकडे बारकाईने लक्ष ठेवून आहेत.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com