Anil Chauhan
Anil ChauhanTeam Lokshahi

देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांची नियुक्ती

चौहान यांची देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती

देशाचे माजी संरक्षण दल प्रमुख बिपिन रावत यांच्यासह त्यांची पत्नी आणि इतर ११ जणांचा नऊ महिन्यांपूर्वी विमान अपघातात झाल्यानंतर, तेव्हापासून संरक्षण दल प्रमुख हे पद रिक्त होते. देशाचे दुसऱ्या संरक्षण दल प्रमुखांची निवड केली आहे. लेफ्टनंट जनरल अनिल चौहान (निवृत्त) यांची केंद्र सरकारने देशाचे दुसरे संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे.

लेफ्टनंट जनरल अनिल चौहान यांचा जन्म १८ मे १९६१ रोजी झाला. त्यांच्याकडे १९८१ लाव ११ गोरखा रायफल्सची जबाबदारी होती. त्यांनी नॅशनल डिफेन्स अकॅडमी, खडकवासला आणि इंडियन मिलिटरी अकॅडमी देहरादून येथून लष्करीचे प्रशिक्षण घेतले. त्यानंतर मेजर जनरल पदावर असताना बारामुला भागात इन्फंट्री डिव्हिजनचे नेतृत्व केले होते. पुढे ते लेफ्टनंट जनरल म्हणून त्यांनी ईशान्य भागात नेतृत्व केले. सोबतच त्यांच्याकडे ईस्टर्न कमांडचे जनरल ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली. निवृत्त होईपर्यंत म्हणजेच मे २०२१ पर्यंत त्यांच्यावर कमांडिंग-इन-चीफ ही जबाबदारी होती.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com