ताज्या बातम्या
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! 8व्या वेतन आयोगाला केंद्र सरकारची मंजुरी
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! केंद्र सरकारने 8व्या वेतन आयोगाला मंजुरी दिली, केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला.
देशभरातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी मिळाली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने 7व्या वेतन आयोगाच्या शिफारशी 1 जानेवारी 2016 रोजी लागू केल्या होत्या, ज्याचा कार्यकाल 31 डिसेंबर 2025 रोजी संपणार आहे.
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. या बैठकीत आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे. त्याबाबत माहिती देताना रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, हा आयोग 2026 पर्यंत स्थापन केला जाईल. सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी यापूर्वीच लागू केल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.