केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, पगार किती वाढला? जाणून घ्या
Admin

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला, पगार किती वाढला? जाणून घ्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला आहे. केंद्र सरकारने काल (24मार्च)कॅबिनेटच्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेतला. केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्क्याने वाढ करण्यात आली आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांचा बेसिक पे 18000 रुपये असेल तर 38 टक्क्याच्या हिशोबाने 6840 रुपये महागाई भत्ता होतो. आता महागाई भत्ता चार टक्क्यांनी वाढून 42 टक्के झाल्याने महागाई भत्ता 7560 रुपये होणार आहे.

केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहिन्याला किमान 720 वाढ होईल. म्हणजे कर्मचाऱ्यांच्या पगारात वर्षाला 8 हजार 640 रुपये वाढ होईल.कर्मचाऱ्यांच्या या डीए आणि डीआरमधील वाढ जानेवारी 2023 पासून म्हणजे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com