रामलला प्राणप्रतिष्ठानिमित्त मोदी सरकारचा निर्णय! कार्यालयांना 'इतक्या' दिवस सुट्टी

रामलला प्राणप्रतिष्ठानिमित्त मोदी सरकारचा निर्णय! कार्यालयांना 'इतक्या' दिवस सुट्टी

राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू असताना मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले.

नवी दिल्ली : राम मंदिराच्या उद्घाटनाची तयारी जोरात सुरू असताना मोदी सरकारने मोठी घोषणा केली आहे. रामलल्लाच्या अभिषेक दिनी 22 जानेवारी रोजी सरकारी कार्यालये अर्धावेळ सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे. याबाबत केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी सांगितले. जनतेच्या भावना लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

रामलला प्राणप्रतिष्ठानिमित्त मोदी सरकारचा निर्णय! कार्यालयांना 'इतक्या' दिवस सुट्टी
मला गोळ्या घातल्या तरी...; जरांगेंचा सरकारवर हल्लाबोल, समाजात गैरसमज पसरवू नका

अयोध्येतील रामलला प्राणप्रतिष्ठेनिमित्त 22 जानेवारी रोजी संपूर्ण भारतात उत्सव साजरी केली जाईल. कर्मचार्‍यांना या उत्सवात सहभागी होण्यासाठी 22 जानेवारी रोजी दुपारी अर्धवेळ कार्यालये बंद ठेवण्याच निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यामुळे 22 जानेवारी रोजी भारतातील सर्व केंद्र सरकारची कार्यालये, केंद्रीय संस्था आणि केंद्रीय औद्योगिक आस्थापने 2:30 वाजेपर्यंत बंद राहणार आहेत.

तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील राम मंदिरावरील स्मरणार्थ टपाल तिकीट आणि जगभरातील प्रभू रामावर जारी केलेल्या टपाल तिकिटांचे पुस्तक प्रसिद्ध केले. यावेळी पीएम मोदी यांनी राम, सीता आणि रामायण यांची महानता काळ, समाज, जात, धर्म आणि प्रदेशाच्या सीमांच्या पलीकडे आहे. ते सर्वांना जोडतात, असे म्हंटले आहे.

आतापर्यंत कोणत्या राज्यांनी सुटी जाहीर केली आहे?

श्रीरामाच्या अभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गोवा, हरियाणा आणि छत्तीसगडमध्ये सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com