Admin
बातम्या
12 डब्यांच्या फास्ट लोकलमध्ये करण्यात आला मोठा बदल
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील गाड्यांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या जलद मार्गावरील गाड्यांमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. आज २० फेब्रुवारीपासून २०२३ मध्य रेल्वेवरील जलद मार्गाच्या गाड्या या १२ डब्ब्यांऐवजी १५ डब्याच्या स्थानी थांबतील. १२ डब्यांच्या पुढील पहीला मोटर मॅन डब्बा आता ३ डब्बे पुढे जाऊन १५ डब्यांचा मोटर मॅन डबा जिथे थांबत होता तिथे थांबेल.
मध्य रेल्वेने १२ डब्याच्या गाडीचे स्थान बदलले आहे पण सर्व गाड्या १५ डब्याच्या करण्याबाबत काहीही निर्णय झालेला नाही.
या स्थानकांवरील गर्दी पाहता अनेकदा प्रवाशांनी मध्य रेल्वेने सरब लोकल गाड्या या १२ ऐवजी १५ डब्याच्या कराव्यात अशी मागणी केली होती. कल्याण, डोबिंवली , दिवा , ठाणे , मुलुंड , भाडूंप , घाटकोपर , कुर्ला , दादर , भायखळा या स्थानकांवरून प्रवास करणाऱ्यांसाठी हा बदल असणार आहे.