ताज्या बातम्या
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता; नवीन धोरणांविरोधात मोटरमन आंदोलनाच्या तयारीत
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन धोरणांविरोधात मोटरमन आंदोलनाच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. जादा काम करण्यास मोटरमनचा विरोध आहे. प्रशासनाच्या नवीन धोरणांना विरोध करण्यासाठी मध्य रेल्वेचे मोटरमन ‘‘जादा काम’’ करणे बंद करणार असल्याची माहिती मिळत आहे.
सेंट्रल रेल्वे मजदूर संघाकडून सांगण्यात आले आहे की, मोटरमन ‘‘जादा काम’’ करणे टाळणार आहेत. त्यांना नियोजित काम फक्त केले जाणार आहे. बुधवार किंवा गुरुवारी सकाळपासून जादा काम करणे बंद करणार आहोत असे सांगण्यात आले आहे.
यामुळे आता जादा कामास नकार दिल्याने लोकल फेऱ्यावर मर्यादा येणार असून लाखो प्रवाशांचा फटका बसणार आहे.

.png?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)