Central Railway :  मध्य रेल्वेचा Masterplan!
Central Railway : मध्य रेल्वेचा Masterplan! एका पत्रामुळे बदलू शकते, तुमच्या ऑफिसची वेळ नेमकं काय जाणून घ्या...Central Railway : मध्य रेल्वेचा Masterplan! एका पत्रामुळे बदलू शकते, तुमच्या ऑफिसची वेळ नेमकं काय जाणून घ्या...

Central Railway : मध्य रेल्वेचा Masterplan! एका पत्रामुळे बदलू शकते, तुमच्या ऑफिसची वेळ नेमकं काय जाणून घ्या...

मुंबई रेल्वे: 800 कार्यालयांना पत्र, ऑफिस वेळा बदलून लोकल गर्दी कमी करण्याचे आवाहन.
Published by :
Riddhi Vanne
Published on

The Railway Administration Has Sent Letters To Over 800 Offices In Mumbai, Requesting Them To Stagger Their Office Timings : मुंबईमधील वाढत्या लोकलची गर्दी आणि त्यातून होणारे भीषण अपघात पाहता आता रेल्वे प्रशासनाने विविध योजनांची आखणी करायला सुरुवात केली आहे. रेल्वे प्रशासनाने लोकांच्या जीवाचा विचार करून एक धोरणात्मक पाऊल पुढे टाकले आहे. मुंबईमधील 800 पेक्षा जास्त कार्यालयांना यासंदर्भात पत्र पाठवले गेले असून त्यांनी आपल्या कार्यालयीन वेळामध्ये टप्याटप्याने बदल करावा अशी विनंती यात करण्यात आली आहे. लोकलची गर्दी कमी व्हावी आणि प्रवाशांचा प्रवास हा आरामदायी आणि सोईस्कर व्हावा हा त्यामागचा मुख्य हेतु असल्याचे यावेळी रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

दररोज सकाळी लोकलला कामाला जाणाऱ्या प्रवाशांची प्रचंड गर्दी पाहायला मिळते. बहुतेकवेळा सगळ्याच्या कामाच्या वेळा या सारख्याच असल्यामुळे ही गर्दी दुपटी तिपटीने वाढते. बहुतांश कार्यालयांच्या वेळा सकाळी 10 ते संध्याकाळी 7 पर्यंत अश्याच असतात. त्यात कामाला वेळेवर न पोहोचल्यास पगारही कापला जातो. परिणामी लोकलमध्ये चढण्यासाठी चढाओढ सुरु राहते. त्यातच वेळेवर कामावर पोहोचता यावे यासाठी मग पर्यायाने दरवाजात लटकण्याच्या प्रमाणात वाढ झालेली दिसून आली आहे.

त्यातच अश्या दरवाजामध्ये लटकण्यामुळे अपघाताचे प्रमाण मागील वर्षीपेक्षा 30 टक्यांनी वाढल्याचे चित्र आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने विचार करून रेल्वे प्रशासनाने मुंबईमधील सरकारी कार्यालये, कॉर्पोरेट ऑफिसेस, बँक, महापालिका, महाविद्यालये अश्या 800 पेक्षा जास्त संस्थांना आणि कार्यालयांना विनंतीपत्र पाठवण्यात आले आहेत. या पत्रात प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करता तुम्ही तुमच्या कार्यालयीन वेळेमध्ये टप्याटप्याने बदल करावा अशी विनंती यात करण्यात आली आहे. यामुळे रेल्वेवरील गर्दीचाही भार थोडा कमी होईल आणि प्रवाशांनाही यामुळे थोडा फायदा होऊ शकतो अश्या आशयाचे हे पत्र आहे.

या प्रकरणात राज्य सरकारनेही हस्तक्षेप केल्यास त्याचा जास्त परिणाम होऊ शकतो अशी विनंती रेल्वे प्रशासनाने राज्य सरकारला केली आहे. आता रेल्वे प्रशासनाच्या या विनंतीला मुंबईमधील किती कार्यालये प्रतिसाद देतात हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.

हेही वाचा...

Central Railway :  मध्य रेल्वेचा Masterplan!
MNS Morcha Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधव यांची पोलिसांनी सोडलं, मनसेची भूमिका काय?
logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com