Central Railway Mega Block : मध्य रेल्वेच्या एलटीटी स्थानकात 7 दिवसांचा ब्लॅाक, वेळापत्रकात बदल

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी एलटीटी यार्डमधील कामासाठी 11 ते 18 फेब्रुवारीदरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
Published by :
shweta walge

मध्य रेल्वेच्या लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी एलटीटी यार्डमधील कामासाठी 11 ते 18 फेब्रुवारीदरम्यान मध्यरात्री मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सात दिवसीय ब्लॉकमध्ये निरनिराळी कामे हाती घेण्यात येणार असून अनेक एक्स्प्रेसच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, लोकमान्य टिळक टर्मिनस (एलटीटी) येथे कोचिंग सुविधा वाढवण्यासाठी मध्य रेल्वे ११/१२ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार) ते १८ फेब्रुवारी २०२४ (रविवार/सोमवार) रात्रीपर्यत ७ दिवस लोकमान्य टिळक टर्मिनस यार्डमध्ये "मध्यरात्री ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक" घेणार आहे. या ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक दररोज रात्री १०. ३० ते मध्य रात्री ३.३० वाजेपर्यत असणार आहे.

या ब्लॉकमुळे १२/१३ फेब्रुवारी २०२४ सोमवार/मंगळवारी ट्रेन क्रमांक 12141 लोकमान्य टिळक टर्मिनस- पाटलीपुत्र एक्स्प्रेस सोमवारी रात्री सुटणारी १३.०२.२०२४ (मंगळवार) रोजी ०४:३० वाजता पुन:निर्धारित करण्यात आली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com