Ghibli Image : घिब्ली इमेज फीचरवरुन सीईओंची लोकांना विनंती म्हणाले, टीमला झोप....
चॅटजीपीटी मेकर ओपनएआयने गेल्या आठवड्यात 40 इमेज मेकर सादर केले आणि त्याचे घिबली स्टुडिओ फीचर दुसऱ्या दिवशीच व्हायरल झाले. सध्या सर्वत्र घिब्ली इमेज फीचरचा क्रेज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. सेलिब्रिटी असो किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएंसर, प्रत्येकजण आपल्या वेगवेगळ्या फोटोंचे घिब्ली इमेज तयार करत आहेत.
या फिचरने लोकांना अक्षरश: वेड लावले आहे. स्टुडिओ घिब्लीचा वापर भारतासह इतर देशातही मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व्हरवरील दबाव वाढला त्यावरुन आता स्टुडिओ घिब्लीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी ट्विटरवर एक ट्वीट करत लोकांना एक विनंती केली आहे.
सीईओ सॅम ऑल्टमन यांची लोकांना विनंती
स्टुडिओ घिब्लीचे सीईओ सॅम ऑल्टमन यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांविषयी काळजी व्यक्त करत ट्वीट मध्ये लिहलं की, "कृपया प्रतिमा तयार करण्यावर थोडावेळ शांत राहा, हा वेडेपणा आहे, आमच्या टीमला झोपेची गरज आहे" अशी दिलगिरीची विनंती त्यांनी केली आहे.