Ratnagiri
Ratnagiri Team Lokshahi

सीईटीपी तुंबली, 75 उद्योग धंदे बंद होण्याच्या संकट..?

सीईटीपीतील सुरू असलेला गाळ उपसा एमआयडीसीने थांबवला आहे.
Published by :
Sagar Pradhan

लक्ष्मीकांत घोणसेपाटील|रत्नागिरी: मुंबई गोवा या राष्ट्रीय महामार्गावरील खेड येथील लोटे सीईटीपीतील गाळ काढण्याची प्रक्रिया योग्य नसून काढलेला गाळ सुकवता येत नसल्याने सीईटीपी प्रचंड प्रमाणात तुंबली आहे. त्यामुळे येथील 75 उद्योग धंद्यांवर कंपन्या बंद होण्याचे संकट उभे राहिले आहे.

सीईटीपीतील सुरू असलेला गाळ उपसा एमआयडीसीने थांबवला आहे. त्यामूळे रासायनिक सांडपाण्यावरील प्रक्रिया करणे अशक्य असल्याचे सांगत सीईटीपीने उद्योगांचा डिस्चार्ज केवळ एका तासांवर आणून ठवल्याने सर्वांचे ईटीपी प्लान्ट फुल्ल झाले आहेत. येत्या दोन-तीन दिवसात मार्ग न निघाल्यास उद्योगांना आपले उत्पादन बंद ठेवण्याची वेळ येणार असल्याने हे एक नवे संकट सर्वांसमोर उभे ठाकले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच प्रकल्पातील साठलेला गाळ काढण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवत हे काम स्थानिक ठेकदाराला देण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपासून गाळ काढणे सुरू झाले. मात्र हा गाळ उपसा योग्य प्रकारे काढला जात नसल्याचे याबाबत येथील उद्योजक आणि आवश्यक सरपंच आंब्रे यांनी तक्रार केली त्यामुळे

गेल्या दोन दिवसापासून एमआयडीसीने गाळ काढण्याचे काम थांबवले. त्यामुळे सीईटीपी प्रचंड तुंबली आहे. परिणामी रासायनिक पाणी स्वच्छ करणारी सीईटीपी तुंबल्याने अनेक उद्योगधंदे बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र एकीकडे लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या सीईटीपी मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात गाळ येतोच कसा असा प्रश्नही त्या निमित्ताने उभा राहिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com