Admin
बातम्या
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून आज यवतमाळ जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून आज यवतमाळ जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शिवसेनेकडून आज यवतमाळ जिल्ह्यात चक्का जाम आंदोलन करण्यात येत आहे. 9 जानेवारीला महाआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. विविध मागण्यांसाठी यवतमाळ जिल्हाभरात आज चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. आज होणारे चक्का जाम आंदोलन हे यवतमाळ जिल्ह्यातील 16 तालुक्यात होणार आहे.
माजी राज्यमंत्री संजय देशमुख, माजी आमदार विश्वास नांदेकर यासह जिल्ह्यातील इतर प्रमुख नेत्यांनी हे आंदोलन आक्रमक करणार आहेत. आज दुपारी 12 वाजता हे चक्का जाम आंदोलन करण्यात येणार आहे. कापसाला प्रति क्विंटल 10 हजार रुपयांचा हमी भाव जाहीर करावा. तसेच कापसाची त्वरित खरेदी चालू करावी. सोयाबीनला प्रति क्विंटल 7 हजार रुपयांचा रुपये हमी भाव जाहीर करावा, प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत.