Maharashtra Weather Update
Maharashtra Weather Update

Heavy Rain : महाराष्ट्रात पुढील काही दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
Published by :
Varsha Bhasmare
Published on

थोडक्यात

  • अरबी समुद्रात निर्माण झाला कमी दाबाचा पट्टा

  • महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा

  • विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पुढील काही दिवस महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. राज्यात वादळी वारे, विजा आणि अवेळी पावसामुळे जीवनमान प्रभावित होण्याची शक्यता आहे. पूर्व मध्य अरबी समुद्रावरील हे कमी दाबाचे क्षेत्र मागील काही तासांत नैऋत्येकडे सरकले असून सध्या ते मुंबईपासून सुमारे ७६० किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे. या प्रणालीच्या प्रभावामुळे २६ ते ३० ऑक्टोबर २०२५ दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पावसाचा प्रभाव राहणार असल्याचे मुंबईतील प्रादेशिक हवामान विभागाने सांगितले.

येणाऱ्या काळात कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल, तर काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे. मराठवाडा भागात २६ ते २९ ऑक्टोबरदरम्यान हलका ते मध्यम पाऊस आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मच्छीमारांसाठी चेतावणी

समुद्राला उधाण असल्याने पूर्व मध्य आणि आग्नेय अरबी समुद्र तसेच लक्षद्वीप, कोमोरिन क्षेत्र, कर्नाटक व केरळ किनारपट्टीवर २७ ऑक्टोबरपर्यंत समुद्रात उधाण ते तीव्र उधाण अशी स्थिती राहण्याचा अंदाज आहे. ईशान्य अरबी समुद्र, महाराष्ट्र-गोवा व गुजरात किनारपट्टीवर २६-२७ ऑक्टोबर दरम्यान वादळी वारे ४५ ते ५५ किमी प्रतितास वेगाने वाहू शकतात. म्हणून मच्छीमारांना पुढील दोन दिवस समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

उत्तर महाराष्ट्र किनारपट्टी (डहाणू ते श्रीवर्धन) आणि दक्षिण महाराष्ट्र-गोवा किनारपट्टी (बाणकोट ते मोरमुगाव) येथील सर्व बंदरांवर स्थानिक खबरदारीचे निशाण फडकवत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. वादळी वारे, वीजा आणि अवेळी पावसामुळे पिकांचे, झाडांचे आणि झोपड्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही शहरी व सखल भागांमध्ये अल्पकालीन उद्भवू शकते. पूरस्थिती उद्भवू शकते.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com