ताज्या बातम्या
Chandni Chowk Flyover : वाहतूक कोंडी होणार दूर; चांदणी चौक उड्डाणपूल होणार खुला
चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होणार आहे.
चांदणी चौक पुलाचे आज लोकार्पण होणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुलाचे उद्घाटन करणार आहेत. सकाळी ११ वाजता हा समारंभ होणार आहे. सर्वाधिक वाहतूक कोंडी होणाऱ्या चांदणी चौक परिसरात आता वाहतूक कोंडी संपणार आहे.
हा पूल दिवसाला दीड लाख वाहने या ठिकाणावरुन सुसाट धावू शकतील. १७ किलोमीटर लांबीचे रस्ते तयार करण्यात आले आहे. या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार ,पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थिती राहणार आहेत.
पुलाचे आज लोकार्पण होत असल्यामुळे डॉग पथक आणि बॉम्बशोध पथकाने परिसराची तपासणी केली.