Chandrahar Patil : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल

Chandrahar Patil : वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला.
Published by :
Siddhi Naringrekar

सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला. सांगलीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढविलेल्या काँग्रेसच्या विशाल पाटील यांचा विजय झाला आहे.

याच पार्श्वभूमीवर आता चंद्रहार पाटील यांनी प्रतिक्रिया देत एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांची ही पोस्ट व्हायरल होत आहे.

ही पोस्ट शेअर करत चंद्रहार पाटील म्हणाले की, या निवडणुकीत कोणाला दिलदार शत्रू मिळाले तर कोणाला दिलदार मित्र मिळाले पण माझ्यासारखा शेतकऱ्याच्या पोराला पराभूत करण्यासाठी सर्वच सहकारी मित्र, एकत्र आले आणि शत्रू म्हणून समोर उभे राहिले, पण वेळ प्रत्येकाची येते, आज तुमची आहे, उद्या माझी येईल. असे चंद्रहार पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com