संभाजीनगरच्या घटनेमध्ये मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस, भागवत कराड-जलील यांचं प्लॅनिंग - चंद्रकांत खैरे
Admin

संभाजीनगरच्या घटनेमध्ये मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस, भागवत कराड-जलील यांचं प्लॅनिंग - चंद्रकांत खैरे

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. रा

रामनवमीच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान राडा झाला आहे. राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली.

पोलिसांच्या कारवाईनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या.

याच पार्श्वभूमीवर चंद्रकांत खैरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. खैरे म्हणाले की, राज्यात अशांतता निर्माण करण्याचे काम मिंधे सरकारचे चालले आहे. गृहमंत्र्यांचा या ठिकाणी लक्ष नाही. 2 तारीखला जो महाविकास आघाडीचा मेळावा आहे तो डिस्टर्ब करण्याचे काम मिंधे सरकारचे आहे. याचे मास्टरमाईंड देवेंद्र फडणवीस, भागवत कराड-जलील आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com