ताज्या बातम्या
कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार
कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार
अमोल धर्माधिकारी, पुणे
कुख्यात गुंड गजा मारणेकडून चंद्रकांत पाटलांचा सत्कार करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. कुख्यात गुंड गजानन मारणे याने मंगळवारी झालेल्या दही हंडी कार्यक्रमात मंत्री चंद्रकांत पाटील यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं.
गजानन मारणे हा पुण्यातील कोथरूड भागात वास्तव्यास असून चंद्रकांत पाटील कोथरूडचे आमदार असून आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा कोथरूड मधुन निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.
गजा मारणे आणि चंद्रकांत पाटलांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असून या व्हिडिओमुळे नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.