त्यांच्यात बंडखोरी झाली नाही. कारण, त्यांच्यात फेविकॉल होता, त्यांची युती तुटेल हे गृहीत धरू नका - चंद्रकांत पाटील

त्यांच्यात बंडखोरी झाली नाही. कारण, त्यांच्यात फेविकॉल होता, त्यांची युती तुटेल हे गृहीत धरू नका - चंद्रकांत पाटील

शिरुर तालुक्यात भाजप बुथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

शिरुर तालुक्यात भाजप बुथ प्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला चंद्रकांत पाटील यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, 2019 मध्ये आपल्यासोबत असलेले अघोषित होते. तेच आता 2024 मध्ये घोषित निवडणूक लढणार आहेत.2014 आणि 2019च्या निवडणुका बघता पुढील निवडणूक सोप्पी नाही.

आपल्याबद्दलची भीती हे त्यांचं फेविकॉल आहे. फेवीकॉल ला नाव आहे ‘भाजपा’….घाबरून हे एकत्र काम करत आहेत. आपण मरू, अशी भावना त्यांच्यात आहे. कारण थेट लढत झाली. त्यांच्यात बंडखोरी झाली नाही. कारण, त्यांच्यात फेविकॉल होता. त्यांची इथून पुढे युती तुटेल हे गृहीत धरू नका, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com