शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटींची तरतूद - चंद्रकांत पाटील
Admin

शिवरायांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटींची तरतूद - चंद्रकांत पाटील

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो.

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं.

यावेळी चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र स्थापनेच्या आपणास शुभेच्छा! हुतात्म्यांच्या स्मृती अभिवादन करतो. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत ज्यांनी सहभाग घेतला त्यांच्याविषयी आदर व्यक्त करतो. आपल्या राज्याला राज्यगीत मिळालं आहे. गडकिल्ले, ही आपली ओळख आहे. या सगळ्याची जपणूक करणं गरजेचं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत 108 हुतात्म्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली, त्या वीरांना विनम्र अभिवादन असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

यासोबतच त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या राज्याभिषेक सोहळ्यानिमित्त 350 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. किल्ले शिवनेरीवर संग्रहालय उभारण्यात येणार आहे. असे पाटील म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com