अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना चंद्रकांत पाटलांनी लावली कात्री

अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना चंद्रकांत पाटलांनी लावली कात्री

अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना चंद्रकांत पाटलांनी लावली कात्री लावली आहे.

अजित पवारांनी मंजूर केलेल्या कामांना चंद्रकांत पाटलांनी लावली कात्री लावली आहे. पुणे जिल्ह्याचे माजी पालकमंत्री अजित पवार यांच्या अनेक कामांना नव्या पालकमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे. काल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ३०३ कोटींच्या विकास कामांना चंद्रकांत पाटलांकडून मंजुरी देण्यात आली तर बारामतीतील 245 कोटींच्या कामांना नव्या पालकमंत्र्यांकडून स्थगिती देण्यात आली आहे.

पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत ३०३ कोटींच्या विकासकामांना मंजुरी देण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव डॉ. राजेश देशमुख, जिल्हा नियोजन अधिकारी संजय मरकळे उपस्थित होते. राज्यात सरकार बदल झाल्यानंतर पूर्वीच्या महाविकास आघाडीच्या सरकारने दिलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सर्वच कामांना स्थगिती दिली होती. चंद्रकांत पाटील म्हणाले की, “मान्यता दिलेल्या कामांची यादी पाहिल्यावर विरोधक आमदारांनाही आनंदाचा धक्का बसेल अशी मान्यता दिली आहे. या त कोणतेही राजकारण केले नसून विकासाचे राजकारण केलेले नाही. सर्वांना सामावून घेण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांनीही जिल्ह्यातील विकासमकामे सुचविली होती. नव्या सरकारमधील शिवसेना भाजपच्या नेत्यांनी कामे पडताळून ती जोडण्यात आली आहेत. नव्याने सुचविलेल्या गावांच्या विकासकामांनाही मान्यता देण्यासाठी निधी शिल्लक असतो त्याचा वापर करण्यात आला आहे. यातून दोन्हीकडील नेत्यांचे समाधान होणारआहे.” ही सर्व विकासकामे नियोनबद्ध पद्धतीने वेळेत पूर्ण करण्यात यावेत आणि कामांचा दर्जा चांगला राहील याकडेही विशेष लक्ष द्यावे, असे त्यांनी सांगितले आहे.

यासोबतच ते म्हणाले की, “एखाद्या नेत्याने त्यांच्या काळातील आमदाराला थोडा निधी देऊन आपल्याकडे मोठा निधी ठेवला असेल तर तो निधी कमी करण्यात येईल. त्यांनी त्यांच्या आमदारांना न्याय दिला नाही, तो आता दिला आहे. बारामतीच्या निधीला देखील अजित पवार रागावतील इतकी कात्री लावलेली नाही. ते अस्वस्थ होती, रागावतील नाराजी व्यक्त करतील इतकी कात्री निश्चितच लावलेली नाही,” असे त्यांनी सांगितले.

Lokshahi Marathi
www.lokshahi.com