chandrashekhar Bawankule
chandrashekhar Bawankule Team Lokshahi

वारकऱ्यांना टोलवसुलीपासून दिलासा मिळणार का? चंद्रशेखर बावनकुळे यांचे नितीन गडकरींना पत्र

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरींना पत्र लिहिले आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरींना पत्र लिहिले आहे. वारकरी आणि संबंधित संस्थांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे टोल संदर्भात विनंती केली. वारकऱ्यांच्या वारी मार्गावरील पेनूर टोल प्लाझाची प्रस्तावित टोल वसुली प्रक्रिया पुढे ढकलण्यात यावी. अशी मागणी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नितीन गडकरी यांना केली आहे.

आषाढी यात्रा २९ जून रोजी होणार आहे. यात्रेसाठी राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनासह विविध विभागांकडून जय्यत तयारी करण्यात येते. या पत्राची दखल घेत नितीन गडकरी काय निर्णय घेतात, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com