Chandrashekhar Bawankule : अमरावतीची जागा भाजप लढणार आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल

Chandrashekhar Bawankule : अमरावतीची जागा भाजप लढणार आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. याच पार्श्वभूमीवर आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधला. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, आम्ही 6 - 7 जागेमध्ये चर्चा करतो आहे. फार तिढा नाही आहे. चर्चा करुनच सुटणार आहे. लवकरच याची बैठक होईल आणि तिढा संपेल. आज उद्या निर्णय होईल असं वाटतं. मोठ्या प्रमाणात जनता मोदीजींनाच मतदान करेल.

उदयनराजेजी यांची सातारा लोकसभेची मागणी आहे. महायुतीमध्ये जशी चर्चा होईल तसे आम्ही पुढे जाऊ. अमरावतीची जागा ही भाजपाकडे आहे आणि लवकरच उमेदवार जाहीर होईल. 100 टक्के भाजपचाच उमेदवार लढणार आहे. आमचा तिढा नाही आहे चर्चा सुरु आहे. अमरावतीची जागा भाजप लढणार आहे.

भाजपचाच उमेदवार राहणार आहे आणि आमचं महायुतीचं सर्व अडसूळ साहेब, बच्चू कडूजी असतील आम्ही सर्वांची या ठिकाणी मदत घेऊ. निश्चितपणे ही जागा आम्ही 100 टक्के जिंकू. सर्व महायुतीचे घटक पक्ष आमच्या उमेदवाराला मदत करतील. सर्वच जागेवर आम्ही चर्चा करत आहे. असे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com