तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं वक्तव्य

तर आम्ही टिळकांना उमेदवारी देऊ; चंद्रशेखर बावनकुळेंच मोठं वक्तव्य

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे.

विधान परिषद निवडणुकांनंतर आता पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीकडे सर्वांचं लक्ष आहे. कसबा विधानसभा मतदारसंघासाठी भाजपने आपला उमेदवार जाहीर केला आहे. आज काँग्रेसकडून उमेदवार जाहीर करण्यात आला आहे. कसब्यात काँग्रेसकडून रविंद्र धंगेकरांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

जर मुक्ता टिळक यांच्या घरी ही उमेदवारी दिली असती तर बिनविरोध करण्याचा विचार केला असता असे नाना पटोले यांनी म्हटले होते. . उमेदवारी अर्ज भरण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, शरद पवार, उद्धव ठाकरे आणि नाना पटोले यांना आजही विनंती करतोय की ही निवडणुक बिनविरोध व्हावी. मुक्ताताई असत्या तर प्रश्नच नव्हता, कोणी कोणाला डावलत नाहीये ब्राह्मणांनी तर पक्षासाठी आयुष्य दिलंय. पक्षाने ब्राह्मण समाजाला न्याय दिलाय आणि समाजानेही खूप काही दिलंय. आजही त्यांनी चिंचवड आणि कसब्याला पाठिंबा दिला तर आम्ही तसा विचार करु बापट यांची प्रकृतीदेखील चांगली नाही. त्यामुळे भाजप कुणावर अन्याय करत नाही. असे बावनकुळे म्हणाले.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com